Shri Swami Samarth Vyasanmukti Seva Trust
श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट (मठ)
रजिस्टर नंबर: ई 1226, सातारा
पत्ता: आंबेघर (रासाटी), कोयनानगर, ता. पाटण, जि. सातारा – 415207, महाराष्ट्र
संपर्क:
संस्थापक अध्यक्ष व मठाधिपती – श्री रमेश यशवंत फुके (ऊर्फ नाना महाराज)
कार्यकारी अध्यक्ष – श्री जयवंत रमेश फुके
📞 9403348497 / 7744089788
🏵️🌲🕉️ माहितीपत्रक 🕉️🌲🏵️
सर्व स्वामी भक्तांना नमस्कार.
श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट (मठ) हे सन 1996 सालापासून कोयनानगर येथे अखंडपणे चालू आहे. संस्थापक अध्यक्ष व मठाधिपती श्री रमेश यशवंत फुके (ऊर्फ नाना महाराज फुके) यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व कामकाज चालते.
या मठामुळे आजपर्यंत लाखो व्यसनी लोक येथे येऊन व्यसनमुक्त झाले आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा तसेच इतर राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात लोक व्यसनमुक्तीसाठी येथे येतात.
मठामध्ये प्रबोधन (प्रवचन) करून व्यसनमुक्त केले जाते. नाना महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्ये पूर्णपणे व्यसनमुक्त करायची आहेत आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
🕉️ खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी 🕉️
🕉️ दारू सोडा – संसार जोडा 🕉️
👉 व्यसनमुक्ती ही सेवा विनामूल्य / मोफत आहे.
👉 महत्त्वाची टीप: व्यसनमुक्ती सेवा फक्त दर गुरुवारी चालू राहील.
👉 व्यसनमुक्तीची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत राहील.
👉 व्यसनमुक्तीसाठी 5 गुरुवार येणे आवश्यक आहे.
👉 दर गुरुवारी उपवास करून येणे.
👉 व्यसनमुक्तीसाठी 2 प्रवचन होतील.
👉 खाली दिलेल्या वेळेतच व्यसनमुक्तीसाठी यावे. उशीर झाल्यास पुढील गुरुवारी यावे.
👉 व्यसनमुक्तीसाठी येणाऱ्या व्यक्तीसोबत घरातील 1 किंवा 2 व्यक्ती असणे आवश्यक आहे.
👉 पहिले प्रवचन: सकाळी 9:30 ते 11:00
सूचना – पहिल्या प्रवचनासाठी बसायचे असल्यास नाव नोंदणीसाठी सकाळी 7:00 वाजेपर्यंत येणे आवश्यक आहे.
👉 दुसरे प्रवचन: सकाळी 11:30 ते 1:00
सूचना – दुसऱ्या प्रवचनासाठी बसायचे असल्यास नाव नोंदणीसाठी सकाळी 10:00 वाजेपर्यंत येणे आवश्यक आहे.
👉 व्यसनमुक्तीसाठी येणाऱ्या व्यक्तीने आधार कार्ड सोबत आणणे.
👉 ज्या व्यक्तीला व्यसनमुक्त व्हायचे आहे त्यांनी उपवास करून येणे (फराळाचे पदार्थ किंवा फळे खाल्ले तरी चालेल).
👉 नाव नोंदणी करताना पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबर नोंद करून सही करणे आवश्यक आहे.
पावती हरवल्यास पुन्हा पावती दिली जाणार नाही, त्यामुळे पावती जपून ठेवावी.
👉 ज्या व्यक्तींना व्यसनमुक्त व्हायचे आहे त्यांनी स्वतः नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. दुसऱ्या व्यक्तीने नोंदणी केल्यास पावती जप्त करण्यात येईल व व्यसनमुक्त केले जाणार नाही.
👉 नाव नोंदणी केल्यानंतर प्रवचन होईल. प्रवचन ऐकल्यानंतरच व्यसनमुक्त केले जाईल.
प्रवचन ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे; त्यातूनच सर्व माहिती मिळेल.
👉 कोणत्याही प्रकारचे व्यसन करून आल्यास व्यसनमुक्त केले जाणार नाही व मठामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
👉 व्यसनमुक्त होण्यासाठी स्वतःची इच्छा असणे आवश्यक आहे. जबरदस्तीने व्यसनमुक्तीसाठी येऊ नये आणि नातेवाईकांनीही जबरदस्तीने आणू नये.
👉 मठातील सुरक्षारक्षकांना सहकार्य करावे आणि त्यांच्याशी वादविवाद करू नये, ही विनंती. 🙏
👉 मठाच्या सेवकांकडून किंवा सुरक्षारक्षकांकडून कोणतीही मागणी किंवा विनाकारण त्रास दिल्यास कार्यकारी अध्यक्ष श्री जयवंत रमेश फुके यांच्याशी संपर्क साधावा.
👉 मठाच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
👉 महत्त्वाची टीप: श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट (मठ) फक्त कोयनानगर येथेच आहे. महाराष्ट्र किंवा इतर कोणत्याही ठिकाणी याची शाखा नाही.
👉 प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला होम-हवन कार्यक्रम आयोजित केला जातो.
स्वर्गीय श्री गणेश रमेश फुके
(श्री रमेश यशवंत फुके / नाना महाराज यांचे चिरंजीव)
संस्थापक अध्यक्ष:
श्री रमेश यशवंत फुके (नाना महाराज)
श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट (मठ)
कार्यकारी अध्यक्ष:
श्री जयवंत रमेश फुके
श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट (मठ
Views : 8808

Business Details :
🏦✨ राष्ट्रीय Re-KYC कॅम्प – विशेष सुविधा ✨🏦📢 या कॅम्पमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र चे नवीन Saving Account काढून मिळेल.
🔐 तुमचे KYC अपडेट करून घ्या आणि बँकिंग सेवा अखंडित ठेवा.
💰 Gold Loan सुविधा उपलब्ध
🛡️ प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना
🛡️ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
👴 अटल पेन्शन योजना
📩 बँकेकडून KYC अपडेटचा मेसेज आला आहे का?
काळजी करू नका! 😊 येथे सोप्या आणि झटपट पद्धतीने KYC अपडेट केले जाईल.
📄 फक्त तुमची वैध कागदपत्रे (OVD) सोबत आणा.
⚠️ KYC नेहमी बँकेच्या अधिकृत माध्यमातूनच अपडेट करा.
📢 RBI सांगते – जाणकार बना, सतर्क रहा! 🚨✅
Operating Hours
06:00 AM - 09:00 PM🎬 Watch Our Work
आमचे काम पाहा आणि स्वतः ठरवा
- State: Maharashtra
- District: Satara
- City: Koynanagar
- Pincode:
.jpg)


.jpg)
.jpg)
.jpg)


